Pimpri Corona Update : रविवारी शहरात 722 नवीन रुग्ण; 2138 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 6) दिवसभरात 722 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 3 लाख 54 हजार 570 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 43 हजार 103 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 7 हजार 609 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 7 हजार 333 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 276 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 7 हजार 677 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 33 लाख 13 हजार 492 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.