Swine Flu : कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्युचे संकट; शहरात 21 रुग्ण, दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कोरोनाचे संकट कमी होत असताना आता पिंपरी-चिंचवडकरांवर स्वाईन फ्ल्युचे (H1N1) संकट आले आहे.(Swine Flu) सद्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात स्वाईन फ्ल्यु आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अद्यापपर्यंत 21 रुग्ण स्वाईन फ्ल्यु (H1N1) आजाराने बाधीत झाले. तर, 2 संशयित स्वाईन फ्ल्यु (H1N1) रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण आहे.

स्वाईन फ्ल्युची प्रामुख्याने ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणे आहेत. बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो.(Swine Flu) घसादुखी असणा-या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. त्या अनुषंगाने सध्या आढळून येत असलेल्या इन्फ्ल्युएंझा ए एच1 एन 1 केसेस पाहता सर्वसामान्य जनतेसाठी वैयक्तिक पातळीवरील इन्फ्ल्युएंझा ए एच 1 एन 1 प्रतिबंधाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना व खबरदारी काळजी घेणे आवश्यक आहे.

Mahesh Landge : महापालिका आणि पीएमआरडीच्या अधिकारांमध्येही स्पष्टता नाही, मग, विलिनीकरणाचा निर्णय कशासाठी? – महेश लांडगे

ही घ्या काळजी!

नागरिकांनी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावा. पौष्टिक आहार घ्यावा. लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. हस्तांदोलन टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये. फ्ल्यु सर्दुश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.(Swine Flu) गंभीर स्वाईन फ्ल्यु रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी, गरोदर महिला, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखिमेचे रुग्ण) यांच्यासाठी महापालिकेच्या रुग्णांलयामध्ये स्वाईन फ्ल्यु (H1N1) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.