Pimpri Chinchwad वाहतूक शाखेने काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर केली कारवाई; 2.31 कोटी दंड वसूल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad) वाहतूक शाखेने काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई करून 2.31 कोटी दंड वसूल केला आहे. अशी माहिती आनंद भोईटे (पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी दिली आहे.
वाहनांच्या काचा या पारदर्शक असाव्यात, असा नियम आहे. पण, काही वाहन चालक हा नियम भंग करून आपल्या चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म चिकटवतात. अशा नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवून मागील 10 महिन्यात 1 जानेवारी ते 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत 2 कोटी 31 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे. हा दंड 23,944 वाहनांवर कारवाई करून वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाने 28 ऑक्टोबर रोजी विशेष (Pimpri Chinchwad) मोहीम राबवून काळा काचा असलेल्या चार चाकी वाहनांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत 422 चार चाकी वाहनांवर कारवाई करून 3 लाख 48 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. भोसरी वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक 100 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या भावनांच्या वाहन चालकांकडून 79,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक विभाग: केसेस: दंड (रुपयांमध्ये)
सांगवी: 49: 39,600
हिंजवडी: 27: 17,500
निगडी : 30: 26,000
चिंचवड: 19: 16,500

पिंपरी: 19: 17,500
भोसरी: 100: 79,000
चाकण: 38: 29,000
देहूरोड: 45: 42,500
दिघी-आळंदी: 11: 8,500
तळवडे: 21: 16,500
वाकड: 28: 26,500
तळेगाव: 17: 17,500
महाळुंगे: 18: 12,000
एकूण: 422: 3,48,600

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.