Pimpri : ‘लिव्हेबल सिटी’ सर्वेक्षणास नागरिकांचा निगेटीव्ह फिडबॅक

दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत नागरिक नाराज

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वतीने महानगरातील ‘राहण्याजोग शहर’ (लिव्हेबल सिटी) सर्वेक्षणासाठी स्थानिक रहिवाशांचा प्रतिसाद (फिडबॅक) जाणून घेतला जात आहे. त्यास पिंपरी-चिंचवड शहरातून केवळ सात हजार 400 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. शहराची लोकसंख्या तब्बल 25 लाख आहे. परंतु, त्या तुलनेत नागरिकांनी त्यास अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, मागील वर्षभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा आहे. त्यामुळे नागरिकांचा निगेटीव्ह फिडबॅक येत आहे.

देशभरातील एकूण 114 मोठ्या शहरांचा या सर्वेक्षणात समावेश आहे. गेल्या वर्षी या सर्वेक्षणात समावेश शहराचे स्थान 69 वे होते. स्वच्छ सर्वेक्षणा प्रमाणे यंदा या सर्वेक्षणात नागरिकांचा प्रतिसादाचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात विविध प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वेक्षणास महापालिकेने एक फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. गेल्या 12 दिवसांत केवळ सात हजार 400 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. सर्वेक्षणात शहरासंदर्भांतील विविध 24 प्रश्न विचारले जातात. हे सर्वेक्षण केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने 29 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे.

या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी होऊन शहराबाबत आपले मत मांडावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातून एकूण 20 हजार नागरिकांचा प्रतिसाद या सर्वेक्षणात नोंदविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, शॉपिंग मॉल, हौसिंग सोसायट्या आदी ठिकाणे जनजागृतीसाठी निवडली आहेत. यंदा पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक सुधारेल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे. शहरासाठी स्वतंत्र विमानतळ नसले तरी, पोलीस आयुक्तालय नव्याने निर्माण झाले आहे. कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.