Pimpri Corona Update : शहरात दिवसभरात 111 जणांना डिस्चार्ज; नवीन 138 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 729 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (बुधवारी, दि. 16) पिंपरी-चिंचवड शहरात 138 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 777 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार 493 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यातील तीन शहरातील तर तीन शहराच्या बाहेरील रहिवासी आहेत.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण चिंचवड (65वर्ष), (61 वर्ष), काळेवाडी (62 वर्ष) येथील आहेत. तर शहराच्या बाहेरील रुग्ण बारमुला (68 वर्ष), आंबेगाव (64 वर्ष), शिरूर (56 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 724 तर शहराच्या बाहेरील 710 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 729 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 831 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 100 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 964 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.