Pune Crime news : विमाननगर आणि मांजरी बुद्रुकमध्ये घरफोडी;पाच लाखांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विमाननगर व मांजरी बुद्रुक परिसरातील बंद घरांचे कुलूप तोडून 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विमाननगर येथील निकुंज सोसायटीमध्ये राहणारे राजू नारायण पाटील (वय ५९) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 4 लाख 33  हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

राजू कुटुंबीयासह रविवारी घराबाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 102 ग्रॅम सोने व रोख रक्कम असा ४ लाख 33 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

सोमवारी सकाळी घरी आल्यानंतर राजू यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला जात असल्याचे विमानतळ पोलिसांनी सांगितले.

दुस-या घटनेत चोरट्यांनी मांजरी बुद्रुकमधील जय मल्हार कॉलनी येथे राहणा-या सुरेखा पोतदार (वय 42) यांच्या फ्लॅटमध्ये चोरी केली आहे. पोतदार 29 नोव्हेंबरला कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची कडी-कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पोतदार सोमवारी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.