Pimpri Corona Update: शहरात आज 120 नवीन रुग्णांची नोंद, 254 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 120 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 254 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 412 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 71 हजार 696 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 4 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 442 रुग्ण गृहविलगीकरणात असून 562 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 47 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 428 आहेत. आज दिवसभरात 13 हजार 822 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 16 लाख 46 हजार 370 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.