Pimpri Corona Update : शहरात आज 139 नवीन रुग्णांची नोंद, 135 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 133 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 139 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 88 हजार 129 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 6 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात मोशीतील 65 वर्षीय पुरुष, वाकड येथील 82 वर्षीय पुरुष, ताथवडेतील 53 वर्षीय पुरुष, संगवीतील 60 वर्षीय महिला आणि बीड जिल्ह्यातील 50 वर्षीय पुरुष, खेड येथील 102 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 129 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 845 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1533 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 636 अशा 2169 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 876 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1375 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.