Pimpri Corona Update: शहरात आज 183 नवीन रुग्णांची नोंद, 123 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 183 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 123 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 71 हजार 153 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 452 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 865 रुग्ण गृहविलगीकरणात असून 587 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 53 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 429 आहेत. आज दिवसभरात 16 हजार 326 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 15 लाख 88 हजार 668 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.