Pimpri corona Update : शहरात आज 2 हजार 72 नवीन रुग्णांची नोंद; 1824 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 009 आणि महापालिका हद्दीबाहेरील 63 अशा 2 हजार 72 नवीन रुग्णांची आज (शुकवारी) नोंद झाली, तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 17 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 23 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात 11 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 63 हजार 128 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 35 हजार 663 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2139 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 865 अशा 3004 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 4677 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 3570 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 2 लाख 30 हजार 869 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.