Pimpri corona Update : 239 नवीन रुग्णांची नोंद, 85 जणांना डिस्चार्ज, 16 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 231 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 239 नवीन कोरोना रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 91 हजार 515 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 85 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 13 आणि पालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. दिवाळीनंतर पहिल्यांदाच आज एकाचदिवशी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये चिंचवड येथील 80, 84 वर्षीय दोन पुरुष, काळेवाडीतील 74 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 53 वर्षीय पुरुष, जुनी सांगवीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 72 वर्षीय पुरुष, तळवडेतील 62 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75, 65 वर्षीय दोन महिला, चिंचवड येथील 75 वर्षीय महिला, दापोडीतील 70 वर्षीय महिला आणि चाकण येथील 48 वर्षीय पुरुष, देहुरोड येथील 54 वर्षीय पुरुष, तळेगाव दाभाडे येथील 70 वर्षीय वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 91 हजार 515 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार 634 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1614 जणांचा तर शहराबाहेरील परंतू, महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 667 अशा 2281 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला.

सध्या 876 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1441 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.