Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 26 रुग्णांची नोंद, 76 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. शहराच्या विविध भागातील 26 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 76 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 621 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 58 हजार 770 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 357 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 314 रुग्ण गृहविलगीकरणात असून 43 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 12 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 833 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 691 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 27 हजार 437 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.