Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 30 रुग्णांचा मृत्यू; दोन हजार 409 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 11) 2 हजार 409 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनामुळे 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 67 हजार 776 एवढी झाली आहे. तर आजवर 1 लाख 40 हजार 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 2 हजार 177 तर शहराच्या बाहेरील 885 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात 25 हजार 574 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 20 हजार 174 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 5 हजार 400 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शहरातील 142 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 3 हजार 181 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 13 हजार 767 जणांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली. आजवर शहरातील 1 लाख 85 हजार 743 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.