Maharashtra Lockdown : महाराष्ट्रात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची टास्क फोर्स सदस्यांची शिफारस

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. आज या संदर्भात टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर राज्यात 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आठ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या बाजूनं आहेत. 

कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या टास्क फोर्स समवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडीसीव्हीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ झहीर उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.