Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 67 रुग्णांची नोंद, 153 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 67 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 153 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे आज एकाही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 620 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 58 हजार 555 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 573 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 518 रुग्ण गृहविलगीकरणात असून 55 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 26 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 833 आहेत. आज दिवसभरात 6 हजार 316 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 34 लाख 10 हजार 402 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.