Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 846  रुग्णांची नोंद; 2 हजार 642 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 846 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 2 हजार 642 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 585 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 53 हजार 848 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 9 हजार 29 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 8 हजार 751 रुग्ण गृहविलगीकरणात असून 278 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 74 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 924 आहेत. आज दिवसभरात 6 हजार 657 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 33 लाख  5 हजार 815 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.