Maval News : भेगडेवाडी, शेलारवाडी येथील डीआरडीओने संपादित केलेल्या जमिनीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भेगडेवाडी आणि शेलारवाडी येथील सुमारे 119 शेतकऱ्यांच्या 475 एकर जमिनीचे संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) संपादन केले आहे. 20 वर्षांपूर्वी जमिनीचे संपादन केले असून अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून याबाबत माजी आमदार दिगंबर भेगडे, मावळ तालुका भाजप अध्यक्ष रविंद्र भेगडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक रघुवीर शेलार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई येथे भेट घेतली.
मुंबई येथे केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांची मावळ तालुक्यातील भेगडेवाडी आणि शेलारवाडी येथील DRDO मध्ये सुमारे 119 शेतकऱ्यांच्या 475 एकर जमीनी भुसंपादन मोबदल्याच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्यासोबत मावळ तालुका भाजप अध्यक्ष रविंद्र (आप्पा) भेगडे यांनी भेट घेतली यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक रघुवीर शेलार हे देखील उपस्थित होते.

शेलारवाडी व भेगडेवाडी परिसरातील DRDO मधील 475 एकर जागा 20 वर्षापासून शासनाने ताब्यात घेतली असून शेतकऱ्यांनी त्यावेळी विरोध केला होता. परंतु त्याबाबत शेतकऱ्यांना काहीच मोबदला मिळाला नाही. सातबारा सरकारच्या नावाने झाला असून न्यायालयात याबाबत खटला चालु आहे. माजी आमदार दिगंबर भेगडे हे त्याबाबत पाठपुरावा करत आहेत.

यावेळी मावळ तालुक्यातील संघटनात्मक कार्यासंदर्भात सविस्तर चर्चा व शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत आणि आतापर्यंत झालेल्या न्यायालयीन पत्रव्यवहारबाबतच्या कागदपत्रांची माहिती केंद्रीयमंत्री गडकरी यांनी घेतली व मोलाचे मार्गदर्शन करून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. जमिनीच्या मोबदल्याबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संरक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून लवकरात लवकर संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी आश्वासित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.