Pimpri News: गजानन चिंचवडे यांच्या निधनाने चिंचवडमधील सुसंस्कृत, मनमिळाऊ नेतृत्व हरवले – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – चिंचवड गावातील भाजपाचे नेते  गजानन चिंचवडे यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या रूपाने चिंचवड गावातील सुसंस्कृत आणि मनमिळाऊ नेतृत्व आम्ही गमावले आहे, आशा भावना भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी- चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख म्हणून गजानन चिंचवडे यांनी शहराच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. अत्यंत होतकरू कार्यकर्ते, मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेले गजानन चिंचवडे यांच्या अचानक जाणे धक्कादायक आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या अकाली निधनाने चिंचवड गाव आणि भाजपाचे कधीही न भरून  येणारे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.