Pimpri corona Update : शहरात एक हजार 31 जणांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू

शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 44 हजार 405 झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील आज (बुधवारी, दि. 26) एक हजार 31 रुग्णांचे तर शहराबाहेरील 30 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 44 हजार 405 झाली आहे.

दिवसभरात महापालिका हद्दीतील 15 आणि हद्दीच्या बाहेरील तीन अशा एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक हजार 403 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या चार हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बुधवारी 1 हजार 403 जणांना पूर्ण उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 31 हजार 139 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बुधवारी शहरातील 15 रुग्णांचा तर शहराच्या बाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये निगडी येथील एका वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.

आज मृत झालेले रुग्ण पिंपळे सौदागर (पुरुष 73 वर्ष ), ताथवडे (स्त्री 60 वर्ष ), मोशी (स्त्री 65 वर्ष ), निगडी (स्त्री 1 वर्ष ), वाकड (स्त्री 75 वर्ष ), आकर्डी (पुरुष 70 वर्ष), रावेत (पुरुष 89 वर्ष), काळेवाडी (पुरुष 40 वर्ष, पुरुष 58 वर्ष), चिखली (पुरुष 64 वर्ष), भोसरी (पुरुष 80 वर्ष), दिघी (स्त्री 75 वर्ष), चिंचवड (पुरुष 65 वर्ष), पिंपळे गुरव (स्त्री 63 वर्ष), पिंपरी (पुरुष 75 वर्ष), तळेगाव दाभाडे (स्त्री 49 वर्ष), राजगुरुनगर (स्त्री 57 वर्ष), धनकवडी (स्त्री 67 वर्ष) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेरील 30 रुग्णांचे आज निदान झाले. सध्या 691 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू आहेत. बाहेरील 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक हजार 746 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील 124 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.