Pimpri corona Update : शहरात आज 137 नवीन रुग्णांची नोंद, 143 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 137 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली, तर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 143 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील काळेवाडीतील एका 53 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात आजपर्यंत 1 लाख 1248 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 97 हजार 658 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1826 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 768 अशा 2594 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 653 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 533 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 1 हजार 700 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 518 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.