Pimpri Crime : पाऊण लाखांचे बांधकाम साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri Crime) येथील नेहरुनगर परिसरातून बांधकाम साईटवर ठेवलेले सुमारे पाऊण लाखांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी नेहरूनगर, पिंपरी येथे उघडकीस आली.

सागर तुळशीराम उमाळे (वय 28, रा. आकुर्डी. मूळ रा. बुलढाणा) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime: कंपनी सोडण्यास सांगत तिघांकडून एकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या (Pimpri Crime) माहितीनुसार, नेहरूनगर येथे स्नेह मंगल डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन कंपनीची बांधकाम साईट सुरु आहे. त्यावर फिर्यादी सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतात. बांधकामासाठी साईटवरील मोकळ्या जागेत ठेवलेले लोखंडी सळई, ऑटो लेव्हल मशीन, रिबाउंड हॅमर आणि इतर असे 71 हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.