Pimpri Crime: कंपनी सोडण्यास सांगत तिघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज: कंपनी व युनीयन सोड असे म्हणत तिघांनी एका व्यक्तीला मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री सम्राट चौक, लालटोपीनगर पिंपरी येथे घडली. (Pimpri Crime) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Bhosari : भोसरी येथे रंगला ह.भ.प. जयेश महाराजांचा किर्तन सोहळा

 

संजय बापू कदम (वय 51, रा. एमआयडीसी चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामावरून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात होते. लालटोपीनगर मधील सम्राट चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून एक दुचाकी थांबली. (Pimpri Crime) त्यावरील तिघांनी फिर्यादी यांना युनियन सोडून दे, कंपनी सोडून दे असे म्हणत प्लास्टिक पाईपने डोक्यात, पायावर मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून पळून गेले. या प्रकरणाचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.