Bhosari : भोसरी येथे रंगला ह.भ.प. जयेश महाराजांचा किर्तन सोहळा

एमपीसी न्यूज – भोसरी (Bhosari) येथील जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शनिवारी (दि.16) ह.भ.प.जयेश महाराज भाग्यवंत यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनीही गर्दी करत किर्तनाचा आनंद लुटला.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, मोहिनी लांडे, विश्वनाथ लांड, संगीता लांडे तसेच लांडे परिवारातील सदस्य, संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे खजिनदार व विद्यमान नगरसेवक अजित गव्हाणे, विश्वस्त विश्वनाथ कोरडे, विश्वस्त व विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे आदी उपस्थित होते.

Panshet Dam : पानशेत धरणात 62 टक्के तर वरसगाव धरणात 57 टक्के पाणीसाठा

विलास विठोबा लांडे यांचे आई- वडील ह. भ. प. स्व.विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विलास लांडे यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जिर्णोद्धारसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून श़शी आखाडे यांनी 25 लाखांची देणगी (Bhosari) जाहीर केली .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक साकोरे यांनी तर आभार विलास लांडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.