Panshet Dam : पानशेत धरणात 62 टक्के तर वरसगाव धरणात 57 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पानशेत धरण (Panshet Dam) 62 टक्के तर वरसगाव धरण 57 टक्के भरले आहे. 

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणात 55.91 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हे. हे धरण एकूण क्षमतेच्या 100 टक्के भरले आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 48.96 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 46.62 टक्के भरले आहे. वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 207.99 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 57.28 टक्के भरले आहे. पानशेत धरणाच्या  (Panshet Dam) पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या धरणात सध्या 187.65 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरण 62.22 टक्के भरले आहे.

 

गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्याचा पाणीप्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी अजून पावसाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे या काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या वर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. जून महिन्यात पावासाने चांगलीच ओढ दिल्यामुळे पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. मात्र या महिन्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.