Dighi Fraud Case: चऱ्होली येथे दुकानदाराची 6 लाखांची फसवणूक

मपीसी न्यूज : उत्पादनाचे डिलरशिप देण्याच्या बहाण्याने स्टेशनरी दुकानदाराची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. (Dighi Fraud Case) हा प्रकार च-होली बुद्रुक येथे घडला असून याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 

सागर दिलीप ढोरजे (वय 38, रा. च-होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Dighi Fraud Case) त्यानुसार 9734252067 या नंबरवरून फोन करणारे शशांक अगरवाल, 9903586950 या नंबरवरून फोन करणारे संजीवकुमार यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे स्टेशनरी दुकान आहे. त्यांना आरोपीनी फोन करून आयटीसी लिमिटेड कंपनीच्या सर्व उत्पादनांची डिलरशिप मिळवून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. सिक्युरिटी अमाऊंट म्हणून फिर्यादी यांना दोन बँक खात्यांमध्ये पाच लाख 96 हजार 400 रुपये भरण्यास सांगितले. त्यांनतर आयटीसी लिमिटेड कंपनीची खोटी कागदपत्रे बनवून त्यांची फसवणूक केली. या घटनेचा दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.