Chinchwad News: चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे डीपी चा स्फोट झाल्याने विजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज: वाल्हेकरवाडी येथील चिंचवडगाव – रावेत रस्त्यालगत असणार्या डीपीचा आज सकाळी स्फोट झाला आहे. (Chinchwad News) सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

Panshet Dam : पानशेत धरणात 62 टक्के तर वरसगाव धरणात 57 टक्के पाणीसाठा

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सकाळी 10 वा डीपीचा स्फोट झाल्याची वर्दी मिळाल्याने थेरगाव व प्राधिकरण उपविभागाचा प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला होता. डीपी चा स्फोट होऊन खाली ऑइल सांडले होते. महावितरणचे कर्मचारी ही घटनास्थळी पोहोचले होते. (Chinchwad News) त्यांनी डीपी चा विद्युत पुरवठा खंडित केला होता. डीपी च्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरे, हौसिंग सोसायटीमधील विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. सुमारे 30 मिनिटात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाळू व माती टाकून सांडलेले ऑइल साफ केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.