Chakan illegal Weapon: बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज: बेकायदेशीर रित्या पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.(Chakan illegal Weapon) ही कारवाई शुक्रवारी (दि. 15) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.

 Manobodh by Priya Shende Part 72 : न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही 

 

भरत केशव पवार (वय 22, रा. झित्राईमळा, चाकण. मूळ रा. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राजकुमार हनुमंते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Chakan illegal Weapon) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कडाचीवाडी येथे बापदेव वस्तीत पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भरत पवार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजारांचे एक पिस्तूल आढळले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.