Pimpri Crime : सव्वाचार लाखांचे दागिने आणि रोकड साडेतीन तासात पळवले

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 80 हजारांचे दागिने आणि साडेतीन लाख रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी एक ते साडेचार या साडेतीन तासाच्या कालावधीत गव्हाणे आळी, पिंपरीगाव येथे घडली.

सचिन तुकाराम गव्हाणे (वय 44, रा. गव्हाणे आळी, पिंपरीगाव) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी दुपारी एक ते साडेचार या कालावधीत उघडे होते. उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातून 80 हजारांच्या 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या आणि साडेतीन लेखक रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.