Pimpri Crime News : बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा केल्याप्रकरणी कंपनी चालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा केल्याप्रकरणी कंपनी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील एक महिन्यापासून सोमवार (दि. 4) पर्यंत लालटोपी नगर मोरवाडी येथे फिक्सिटी पॅकेजिंग इंडस्ट्रीज लिमिटेड येथे घडला.

सुनील मेहता (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतुल आदिनाथ भोसले (वय 36, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या फिक्सिटी पॅकेजिंग इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने केमिकल रसायन (ऍसिड) साठवण्याचा कोणताही परवाना घेतला नाही. तसेच त्याबाबत कोणतीही उपाययोजना न करता त्याचा बेकायदेशीरपणे साठा केला. यामुळे लोकांच्या जीवितास, आरोग्यास धोका निर्माण झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.