Weather Update : पुण्यात अजून तीन दिवस पावसाची शक्यता, घाट विभागात मुसळधार

एमपीसी न्यूज – पुण्यात सोमवारी (दि.04) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली, मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तर अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची भंबेरी उडाली. पुण्यात अजून तीन दिवस पावसाची शक्यता असून, घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

पुणे हवामान विभागाच्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. 6 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

तसेच, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.