Chakan Crime News : घरातून दागिने आणि रोकड पळवली; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणाच्या अंधपणाचा गैरफायदा घेऊन दोघांनी मिळून घरातून दागिने व पैसे चोरून नेत फसवणूक केली. हा प्रकार 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता खराबवाडी येथे घडली.

संदीप भाऊसाहेब धाडगे (वय 30, रा. धावडे वस्ती, खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 4) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॅकी भाऊ (पूर्ण नाव माहिती नाही), महिला (वय 27) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई व वहिनीने घरातील कपाटात 58 हजारांचे दागिने व 40 हजार रोख रक्कम ठेवली होती. फिर्यादी यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन आरोपींनी दागिने आणि रोख रकमेचा अपहार करून फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक चिटमपल्ले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.