Pimpri Crime News : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याने दुचाकीवरून समांतर जात असलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी कोलमडली. त्यावरून दोघांनी एका दुचाकीस्वार तरुणास बेदम मारहाण(Pimpri Crime News) केली. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी ( 21 जानेवारी) सायंकाळी डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

रोहन बाळासाहेब वाळुंज (वय 22, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime News : 8 किलो गांजासह वृद्धाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळुंज हे त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी सात वाजता कामावरून घरी जात होते. डांगे चौक थेरगाव येथे त्यांच्या समांतर आरोपी दुचाकीवरून आले. दरम्यान आरोपींची दुचाकी कोलमडली. त्यावरून आरोपींनी वाळुंज यांना शिवीगाळ करून मारहाण केली.तसेच वाळुंज यांचे हेल्मेट घेऊन गाडीवर मारून गाडीचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास (Pimpri Crime News) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.