Pimpri Crime News : 8 किलो गांजासह वृद्धाला अटक

एमपीसी न्यूज  – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी (Pimpri Crime News) पथकाने अटक केली. त्याच्याकडून सव्वा लाखांचा 8 किलो 728 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (21जानेवारी) सकाळी दहा वाजताच्या सुमारास विजयनगर काळेवाडी येथे करण्यात आली.

 

जवाहर अर्जुनदास रामनानी (वय 66, रा. विजयनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने भैरन बिनदाडी (रा. ओडिसा) याच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple Saudagar News : अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवाहर याने विक्रीसाठी गांजा आणला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत जवाहर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 20 हजार 340 रुपयांचा 8 किलो 728 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास (Pimpri Crime News)करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.