Pimpri Crime News : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या प्रियकरावर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा (Pimpri Crime News )दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 जानेवारी रोजी दापोडी येथे घडली.

 

महेश भीमराव कांबळे (रा. दापोडी, पुणे. मूळ रा. कोळलुर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडिती महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Crime News : पोलिसात तक्रार दिली म्हणून  महिलेचा केला  विनयभंग

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आरोपी महेश याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादीच्या नकळत त्यांचे अश्लील व्हिडीओ काढले. ते फिर्यादीस पाठवून इतर सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी (Pimpri Crime News ) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.