Pimpri crime News : पिंपरी ग्रेडसेपरेटरमध्ये ट्रकची तोडफोड करून चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका ट्रेलरला (ट्रक) रिक्षा आडवी लाऊन थांबवत ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच ट्रक चालकाच्या खिशातून मोबईल फोन आणि रोकड काढून घेतली. ही घटना शनिवारी (दि. 10) पहाटे पावणे तीन वाजता खराळवाडी, पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये घडली.

मच्छिंद्र मुरलीधर लेंडवे (वय 40, रा. कुजीलवाडी, ता. हवेली) यांनी याबाबत रविवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा ट्रक (एमएच 12 / एफसी 6164) पुण्याहून मुंबईला घेऊन जात होते. खराळवाडी पिंपरी येथील ग्रेडसेपरेटर मधून जात असताना अनोळखी दोघांनी फिर्यादी यांच्या ट्रकला रिक्षा (एम एच 14 / 1987) आडवी लावली.

त्यानंतर ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजारांचा  मोबाईल  फोन आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.