Pimpri crime News : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी रिव्हर रोड, बौद्धनगर पिंपरी येथे घडली.

रजा युसुफ शेख (वय 20, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अर्जुन सरोदे (वय 42), सनी रमेश सरोदे (वय 28), अक्षय अर्जुन सरोदे (वय 28), सागर सरोदे (वय 30), सुरज रमेश सरोदे (वय 27, सर्व रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख आणि आरोपी यांचे मागील सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्याच्या रागातून आरोपींनी 3 ऑक्टोबर रोजी शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

आरोपी अर्जुन आणि सुरज यांनी लाकडी बांबूने, सनी आणि अक्षय यांनी उलट्या कोयत्याने तर आरोपी सागर याने लोखंडी रॉडने शेख यांना मारहाण केली. यामध्ये शेख यांच्या पायाला, हाताला आणि बरगडीवर दुखापत झाली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.