Pimpri crime news : शस्त्राने वार केल्याने तरुण बेशुद्ध; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने डोके कान आणि डोळ्यावर वार करून तरुणाला गंभीर जखमी केले. त्यात तरुण बेशुद्ध पडला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजता बौध्दनगर, पिंपरी येथे उघडकीस आली.

मंटूराम श्रीभगवान राम (वय 18, रा. बौध्दनगर, पिंपरी. मूळ रा. बिहार) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत जखमी तरुणाचा भाऊ पिंटूकुमार बिदेश राम (वय 20) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संटुराम बिनदेश राम (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार रविवारी रात्री नऊ ते सोमवारी सकाळी नऊ या कालावधीत घडला आहे. आरोपी संटुराम याने मंटूराम याला अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने मारले. त्यात मंटूराम याच्या कानाच्यावर डोक्यात, कानावर, डोळ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यातच मंटूराम बेशुद्ध पडला. मंटूराम याला बेशुद्धावस्थेत सोडून आरोपी संटुराम पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.