Pimpri Crime News : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी पिंपरीगाव येथे उघडकीस आली.

आदित्य जयराम नाणेकर (वय 18, रा. नाणेकर वाडा, पवना मित्र मंडळाजवळ, पिंपरीगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य याने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्याच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरीत त्यास रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.