BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सराईत आरोपी अविनाश जाधव तडीपार

पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांची कारवाई

255
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी ही कारवाई केली.

अविनाश महादू जाधव (वय 22, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.

आरोपी अविनाश जाधव हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला एक वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्यावर दुखापत, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी यांसारखे गुन्हे असल्याचे ही कारवाई करण्यात आली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3