Wakad : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज –  तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात शस्त्रासह वावरणाऱ्या तडीपार गुंडाला (Wakad) पोलिसांनी अटक केली आहे.  ही कारवाई बुधवारी (दि. 30) सायंकाळी चौधरी पार्क रोडवर वाकड येथे करण्यात आली.
करण सुबेदार जैसवार (वय 25, रा. गणेशनगर, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कौंतेय खराडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 20 एप्रिल 2023 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवनगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःजवळ कोयता हे शस्त्र बाळगले. कोयता बाळगून तो परिसरात दहशत पसरवित असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक (Wakad) केली. वाकड पोलीस तपास करीत Wakad ) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.