Pimpri: एटीएम फोडून दीड लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज –  गॅस कटरने एटीएम मशिन कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली.

पिंपरी  संत तुकारामनगर येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज समोर ऍक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून त्यातील दीड लाखाची रोकड चोरून नेली. या घटनेमुळे पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.