Wakad: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखूवन एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितल्यास खलास करण्याची धमकी दिली. हा प्रकार वाकड येथे घडला.

सोनू रमेश मलकेकर (रा. वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडीत मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सोनू याने मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास खलास करण्याची धमकी दिली. भितीपोटी मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. अखेर 30 नोव्हेंबर रोजी तिने घडलेला प्रकार कुटूंबियांना सांगितला. त्यानंतर कुटूंबियांनी त्वरीत पोलिसांकडे धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.