Pimpri : स्कूल बसच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह राज्यातील शहरांमध्ये (Pimpri) स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसबाबत शासनाने कठोर कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील स्कूल बसचालक सर्रासपणे नियमांना डावलूून बस चालवत आहेत. अनेक बस चालकांनी बसचे योग्यता प्रमाणपत्र घेतलेले नाही.

जून महिन्यात सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सर्व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. ‘आरटीओ’कडून तसे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले केल्याचे दिसत आहे.

स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची व शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करून वाहन मालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्‍यक आहे.

Shravan : ओळख मराठी महिन्यांची – सणांचा महिना श्रावण

या बरोबरच एका स्कूल बसमध्ये किती विद्यार्थी बसवावेत या बाबत देखील (Pimpri) शासकीय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तरी देखील त्याकडे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरांत दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नुकतेच एका स्कूल बसमध्ये तब्बल 92 विद्यार्थी बसवून चुकीच्या पद्धतीने प्रवास केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून बस चालक-मालक प्रवास का करतात? असा प्रश्‍न आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्‍नही मोढवे यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.