Pimpri : शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच राष्ट्राच्या जीडीपीत वाढ -सचिन साठे

एमपीसी न्यूज – शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला. त्यानंतरच राज्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली. शेतीपुरक व्यवसाय वाढल्यामुळे शेतक-यांच्या उत्पन्नात व राष्ट्राच्या जीडीपीत वाढ झाली. तसेच महाराष्ट्रातून केंद्रात गेलेल्या नेत्यांपैकी शंकरराव चव्हाण यांना सर्वात मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रशासनाची समज आणि प्रशासनावर वचक असणारे नेते हा त्यांचा दरारा शेवटपर्यंत राहिला, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी येथे केले.

माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने प्राधिकरणात आयोजित कार्यक्रमात चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. माजी महापौर कवीचंद भाट यांनी ठराव मांडला. माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे यांनी अनुमोदन दिले.

  • यावेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, सेवा दलाचे राष्ट्रीय सह सचिव संग्राम तावडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे तसेच बाबा बनसोडे, सुंदर कांबळे, दिलीप पांढारकर, ॲड. मोहन अडसूळ, सचिन राऊत, दीपक जाधव, भाऊसाहेब मुगुटमल, लक्ष्मण रुपनर, माधव पुरी, पांडुरंग जगताप, बाबूलाल वाघमारे, मकरध्वज यादव, जॉयस जोसेफ, सज्जी वर्कि, शीतल कोतवाल, उज्वला महाले, शेख महेताब इनामदार, प्रशांत जांभूळे, हिरामण खवळे, अजय खराडे, भास्कर नारखेडे, संदेश नवले, बेंजामिन डिसोजा, प्रा. मिलिंद तायडे, अण्णासाहेब कसबे आदी उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले, देशभर भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. राज्या-राज्यातील सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या परिस्थितीत जातीयवादी, धर्मांध शक्तींच्या विरोधात देशभर लढा उभारण्यासाठी काँग्रेसने संघटना पुनर्बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली.

  • तसेच कार्याध्यक्षपदी विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, मुजफ्फर हुसेन, नितीन राऊत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी सुरु आहे. जास्तीत जास्त पदवीधारकांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सचिन साठे यांनी केले.

प्रास्ताविक गौतम आरकडे, सूत्रसंचालन मयुर जयस्वाल यांनी केले. तर विशाल कसबे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.