Pimpri : विरोधी पक्ष कार्यालयाचे विस्तारीकरण करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या 38 आहे. त्यासाठी सध्या असलेले विरोधी पक्ष कार्यालय लहान होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षासाठी मोठे कार्यालय हवे. तसेच आहे त्या कार्यालयाचा विस्तार करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.

कार्यालयाच्या विस्तारीकरणाबाबत दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर महापालिकेत भाजप पक्षाची सत्ता आली. महापालिकेच्या इतिहासामध्ये सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अस्तित्वात आला. त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षाचे 38 नगरसदस्य असल्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यालय मोठे मिळावे. अथवा त्याचा विस्तार करण्यात यावा.

  • यासाठी सत्ताधा-यांकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या व आंदोलने केली. परंतु सत्ताधारी भाजप पक्षाच्या पदाधिका-यांनी व प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आताही विरोधी पक्षाचे कार्यालय आहे त्याच जागेत असून तिथे सर्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या नगरसदस्यांना बसण्याची अडचण होत आहे.

नुकतेच लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळातच महापौर व स्थायी समिती सभापती कार्यालयाच्या विस्तारीकरणाचे काम चालू करण्यात आले. हे काम आचारसंहितेमध्ये कसे काय चालू करण्यात आले? याला मंजुरी कधी देण्यात आली? या संबधीची सविस्तर माहिती देण्यात यावी. तसेच विरोधी पक्षनेता कार्यालयाचेही विस्तारीकरण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.