Pimpri : जागतिक नृत्यदिनाच्या समारोप कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नृत्य तेजअकॅडमी व नृत्य कला मंदिरच्यावतीने  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नृत्यांचे शिबिर घेण्यात आले होते. नृत्यदिनानिमित्त नृत्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर दि. 14 एप्रिल ते  29 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात झाले.

शिबिरासाठी मराठी इंडस्ट्रीमधील लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम आणि कोहिनूर ग्रुप ऑफ कंपनीचे उद्योजक कृष्ण कुमार गोयल आदी उपस्थित होते.

शिबिराची माहिती देताना नृत्य तेज अॅकॅडमीच्या संस्थापिका तेजश्री अडिगे म्हणाल्या, या शिबिराची सुरुवात 2003मध्ये झाली. लोक नृत्याच्या प्रसारासाठी या शिबिराची सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सिने नृत्य, वेस्टर्न नृत्य, कॉन्टेंपरी नृत्य, बेली नृत्य  असे विविध आंतरराष्ट्रीय नृत्य प्रकार सुरु केले. त्यानंतर  स्थापना केली. जागतिक नृत्यदिनानिमित्त हे कला प्रकार सादर करण्यास सुरुवात केली. या शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमाप्रमाणे एक पारंपरिक नृत्य शिकणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या.

_MPC_DIR_MPU_II

यावर्षी या नृत्य शिबिरामध्ये 4 ते 50 वयोगटातील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण देण्यासाठी तेजश्री अडिगे यांच्यासोबत बंटी धारीवाल (बॉलीवूड कोरिओग्राफर), साक्षी तांजणे (बेली डान्सर), भानुप्रिया जोशी (ज्युनिअर गट), मनाली गोवंडे (लोकनृत्य) आदी प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. या शिबिराची सुरुवात नृत्यकला मंदिरच्या विजेत्या संघाने केली. त्यानंतर चार ते आठ वयोगटातील मुलींनी लावणी सादर केली. ही लावणी कोरिओग्राफर भानुप्रिया जोशी यांनी दिलेल्या “जाऊ कशी, कशी मी शाळेला” या गाण्यावर सादर केली. यानंतर “आवारा भवरे” हे नृत्य झाले.

कोळी समाजाची पार्श्वभूमी सांगणारे नऊ ते बारा वयोगटातील मुलांनी “मी हाय कोळी” ‘वेसावची पारू’ या गाण्यावर नृत्य सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच बॉलिवूड कोकाकोला व लडकी आख मारे या गीतांवर बॉलिवूड नृत्य केले. 12 ते 18 वयोगटातील मुलींनी बेली नृत्य व कॉन्टेंम्पररी नृत्य सादर केले. 25 ते 45 वयोगटातील महिलांनी “घर मोरे परदेसिया” या गाण्यावर सेमी क्लासिकल नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या शिबिरामध्ये विविध पुरस्कार देण्यात आले.

जागतिक नृत्यदिनानिमित्त मागील पाच वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. बाल, युवा, आणि प्रौढ अशा विविध वयोगटातील नृत्य कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून टीव्ही आणि फिल्ममधील दिपाली बोरकर, उत्कृष्ट युवा कलाकार (लावणी नृत्यांगना) सुजाता कुंभार, उत्कृष्ट नृत्य गुरु जतीन पांडे (नटरंग अॅकॅडमी) यांना मिळाला. तर उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून आराध्या चारलवाड, विधी पवार, शर्वरी कुदळे, आदिती माळी, शर्वरी खत्री, रोहित काळे, सिद्धी गायकवाड, तृप्ती मराठे यांना यावर्षीचे पुरस्कार मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाथरे आणि अनिकेत जवळेकर यांनी केले. तसेच प्रशांत शिंदे, सतीश मेंडके, हर्षा आवटी, गौरी घाडगे, प्रज्ञा गोरे यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.