Pune : पत्रकारितेचा मूळ उद्देश लक्षात घेऊन पत्रकारांनी समाजप्रबोधन करावे – भाऊ तोरसेकर

आनंदवन बहुउद््देशीय संस्थेच्या वतीने युवा पत्रकार गौरव पुरस्काराचे वितरण; एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांना पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – जीवन जगत असताना जेव्हा आयुष्यातील आव्हाने संपतात, तेव्हा माणूस व्यसनाकडे वळतो. पत्रकारितेत देखील तसेच आहे. पत्रकारिता क्षेत्र हे तुमच्या आवडीचे क्षेत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये काहीतरी वेगळे देवू शकता. तेच तेच लिहिणे हे देखील एक प्रकारचे व्यसनच आहे. पत्रकारांनी पत्रकारितेचा मूळ उद्देश लक्षात घेऊन आपल्या हाती असलेल्या साधनातून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.

आनंदवन बहुउद््देशीय संस्था, आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त युवा पत्रकार गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन टिळक रस्त्यावरील विशाल सह्याद्री सदन सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, सामाजिक कार्यकर्त्या शामला देसाई, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, ओंकार वहिकर, राजानंद चांदेकर, हर्षल पंडित, अमित खैरे, दत्तात्रय सोनार, अनिरुद्ध हळंदे आदी उपस्थित होते.

  • यावेळी विविध वृत्तपत्रांमधील बातमीदार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातमीदार व वृत्तपत्र विक्रेते यांना गौरविण्यात येणार आले. त्यामध्ये वृत्तपत्रातील बातमीदार मंगेश कोळपकर, लक्ष्मण मोरे, स्वप्निल बापट, सुनिल जगताप, सायली कुलकर्णी, छायाचित्रकार शहाजी जाधव, कपिल पवार, पवन खेंगरे, संदीप घोडके, इलेक्ट्रॉनिक मीडियातील मिकी घई, अमोल धर्माधिकारी, अश्विनी पवार, सागर आव्हाड, अमोल कविटकर, विवेक इनामदार यांसह वृत्तपत्र विक्रेते राम दहाड, चैतन्य गणपुले, अश्विन शिंदे, संतोष जाधव, संतोष मोहोळ यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी भाऊ तोरसेकर म्हणाले, पत्रकार सतत सजग असावा लागतो. सर्वात आधी आपल्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध व्हावी, यासाठी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखील कोणत्या बातम्या आपण देतो याचे भान देखील नसते, हे पत्रकारांमधे होणारे एक प्रकारचे व्यसनच आहे. बातमी देण्याच्या घाईमध्ये त्यामागील सत्यता पडताळली जाते का हे देखील तपासले जात नाही. सध्या पत्रकारांचे वाचन कमी झाले नाही तर वाचनियता कमी झाली आहे, हे पत्रकारांनी लक्षात घेतले पाहिजे. पत्रकारिता जगविण्यासाठी ही वाचनियता वाढविली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

  • डॉ. अजय दुधाणे म्हणाले, समाजात काम करणाºया अनेकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. पंरतु सतत जागरुक राहून समाज प्रबोधन करण्याचे काम करणारा घटक म्हणजे पत्रकार आहेत. अशा युवा पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी युवा पत्रकार पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच घरोघरी वृत्तपत्र पोहोचविणा-या विक्रेत्यांचा वाटाही मोलाचा आहे, असेही ते म्हणाले. भानुप्रताप बर्गे, शामला देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. राजानंद चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.