Pimpri : शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनासुध्दा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ द्या – गजानन बाबर

Give the benefit of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana to the beneficiaries of Shetkari Yojana too - Gajanan Babar : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिले निवेदन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना सुध्दा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत बाबर म्हणतात, सततची नापिकी व दुष्काळामुळे मराठवाडयातील आठ जिल्हे व विदर्भातील सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले होते.

फेब्रुवारी 2014 पासून देशात अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली होती.

या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट 2016 रोजी शेतकरी योजना लागू करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ अनुक्रमे 2 रुपये आणि 3 रुपये प्रति किलो या प्रमाणे गहू व तांदूळ वाटप करण्यात येत आहेत.

मात्र, कोरोना महामारीच्या काळात जनतेची उपासमारी होऊ नये म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 किलो तांदूळ व 1 किलो डाळ मोफत वाटप करण्यात आले. आता या योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ व प्रति कार्ड 1 किलो डाळ मोफत देण्यात यावी अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.