Weather Report : कोकण गोव्यात, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

Chance of torrential rains in Kokan Goa, sparse places in Central Maharashtra

एमपीसी न्यूज – कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.  पुणे वेध शाळेने वर्तवली आहे. 

गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आता पूर्व मध्य अरबीसमुद्र-कर्नाटक किनारपट्टीलगत पोहचला आहे.

गेल्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर  कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे –

कोकण आणि गोवा : रत्नागिरी 14, कणकवली 13, कुडाळ, माथेरान 12 प्रत्येकी, रोहा, ठाणे 11 प्रत्येकी, कल्याण, मालवण 10 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), देवगड, दोडामार्ग, मुरुड, पनवेल, सांगे, सावंतवाडी, उरण 9 प्रत्येकी, पालघर, पेडणे, केपे, रामेश्वर कृषी, वाडा 8 प्रत्येकी, हरनाई, जव्हार, खालापूर, महाड, माणगाव, शहापूर, सुधागड पाली, वेंगुर्ला 7 प्रत्येकी, अंबरनाथ, कर्जत, म्हसळा, मुंबई (सांताक्रूझ), पेण, उल्हासनगर, वैभववाडी 6 प्रत्येकी, वसई, विक्रमगड 5 प्रत्येकी, कानकोन, मंडणगड, मडगाव, मोखेडा, पणजी (गोवा), पोलादपूर, राजापूर 4 प्रत्येकी, भिरा, खेड, लांजा, म्हापसा, मुरबाड, श्रीवर्धन 3 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : आजारा, राधानगरी 12 प्रत्येकी, चांदगड 10, गगनबावडा, लोणावळा (कृषी) 9 प्रत्येकी, महाबळेश्वर 8, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वेल्हे 7 प्रत्येकी, गडहिंग्लज 6, गारगोटी, पन्हाळा प्रत्येकी, जावली मेधा, ओझरखेड़ा 4 प्रत्येकी , शाहूवाडी, वडगाव मावळ 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, बारामती, बोदवड, चांदवड, एरंडोल, जामखेड, कडेगाव, कागल, माळशिरस, पाटण, पौड मुळशी, पेठ, शिराळा, वाई 2 प्रत्येकी.

मराठवाडा : घनसावंगी, माहूर 3 प्रत्येकी , अंबड, अर्धापूर, आष्टी, औंधा नागनाथ, गेओराई, हदगाव, हिंगोली, नांदेड, परंडा, पाटोदा 2 प्रत्येकी, अंबेजोगाई, बदनापूर, भोकरदन, भूम, देगलूर, हिमायतनगर, कळमनुई, पालम, परतूर, पूर्णा, वसमत 1 प्रत्येकी.

विदर्भ : देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मालेगाव, मलकापूर, रिसोड, सिंधखेड राजा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : ताम्हिणी 11, शिरगाव, अम्बोणे, लोणावळा (टाटा), दावडी 9 प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस), खोपोली 8 प्रत्येकी, कोयना (पोफळी), धारावी 7 प्रत्येकी, वळवण 6, शिरोटा, भिवपुरी, कोयना (नवजा), भिरा 5 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वाणगाव खंद 4 प्रत्येकी,

पुढील हवामानाचा अंदाज:

8 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

9-12 जुलै : कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा :

8 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

9 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

10-12 जुलै : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता.

पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची   शक्यता. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत; ढगाळ राहून  मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.