Pimpri : देशातील उद्योजकांसह कामगारांनाही उपजीविकेसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे -गजानन बाबर, गोविंद पानसरे यांची मागणी

Pimpri: Govt should announce financial package for livelihood of industrialists and workers: Gajanan Babar, Govind Pansare

एमपीसी न्यूज – देशातील उद्योजकांसह कामगारांनाही उपजीविकेसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावे -गजानन बाबर, गोविंद पानसरे यांची मागणी केली आहे.

भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम अशा सर्व कंपन्या बंद असून उद्योगांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे कंपनी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर राज्यातून स्थलांतर करत आहेत. याकाळात उद्योगांना केंद्र सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे.

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी चिंचवडच्या वतीने गजानन बाबर व कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत ते म्हणतात, केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवरील कर्जाचे व्याजदर कमी करावेत.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची व्याख्या तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्नाच्या उलाढालीवर वर्गीकरण करण्यात यावे. कामगारांच्या लॉकडाऊन कालावधीमधील 50% वेतनाचा अधिभार केंद्र सरकारने उचलावा, अशी विनंती गजानन बाबर आणि गोविंद पानसरे यांनी केली आहे.

गजानन बाबर व गोविंद पानसरे यांनी उद्योगधंदे व त्यासंबंधी विविध विषय केंद्र सरकारकडे मांडले असून विविध मागण्या केल्या आहेत.

काय आहेत प्रमुख मागण्या ?
# उद्योगांना वीजकर, मालमत्ता कर व इतर कर यावर सवलत देण्यात यावी

# सर्व श्रेणीतील कामगारांचा पीएफ शेअर केंद्र सरकारने भरावा

# लेबर लॉज, फॅक्टरी इंस्पेक्टर लॉज, ईएसआय लॉज पुढील दोन वर्षाकरिता शिथील करण्यात यावेत

# कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारद्वारे विमा संरक्षण देण्यात यावे

# उद्योगांवरील वीजदर, पाणीदर पुढील दोन वर्षांकरिता कमी करावेत

# केंद्र सरकारने बीएस4 चे धोरण तसेच स्क्रॅप पॉलिसी पुढील दोन वर्षांसाठी वाढवावी

# बाहेरील कंपन्या कशा प्रकारे गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.